–चौघेजण ताब्यात
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : छत्तीसगड राज्यातुन कुरखेडा – वैरागड मार्गे मोठया प्रमाणात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक करुन आरमोरी हद्दीतील चिल्लर तंबाखु विक्रेत्यांना पुरवठा करणार असल्याबाबात खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून १८ लाख २७ हजारांचा प्रतिबंधित सुगंधित जप्त केल्याची कारवाई ०२ मे रोजी केली. याप्रकरणी गंगाधर भाष्कर चिचघरे ( वय ३९), महेश सुधाकर भुरसे (वय ३४), सोमेश्वर भाष्कर चिचघरे (वय ३६), अमोल अनिल भुरसे (वय २९) सर्व रा. ठाणेगाव ता. आरमोरी, जि. गडचिरोली यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हयात शेजारील छत्तीसगड राज्यातुन मोठया प्रमाणात सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्हयातील प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर रेड करुन प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जवाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेली जवाबदारी पार पाडत असतांना २ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास ठाणेगाव येथील गंगाधर चिचघरे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगड राज्यातुन कुरखेडा – वैरागड मार्गे मोठया प्रमाणात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक करुन आरमोरी हद्दीतील चिल्लर तंबाखु विक्रेत्यांना पुरवठा करणार असल्याबाबात खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. सदरची माहिती पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, स्था.गु.शा. गडचिरोली यांना देवुन त्यांचे नेतृत्वात योग्य ते नियोजन करुन पोलीस पथक वैरागड टी पॉइंट करीता रवाना करण्यात आले. वैरागड टि-पॉइंट चौकात पोलीस पथकातील अंमलदार यांनी सापळा रचुन दोन संशयीत चार चाकी वाहन येत असतांना दिसुन आल्याने सदर वाहनांना तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहन थांबवुन वाहनाची तपासनी केली असता दोन्ही वाहनात १८ लाख २७ हजार रुपयांचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु वरील इसम हे आपल्या ताब्यात बाळगुन वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता अन्न व प्रशासन विभाग, गडचिरोली यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, स्था.गु.शा. गडचिरोली यांच्या नेतृत्वात सहा.फौ. नरेश सहारे, पोहवा अकबरशहा पोयाम, पोअं प्रशांत गरफडे, पोअं श्रीकृष्ण परचाके, पोअं श्रीकांत बोइना, चापोअ/दिपक लोनारे यांनी पार पाडली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #sthanikgunheshakha #pratibandhittambakhu #crimenews #vairagad #cgnews #chattisgarh)