ज्येष्ठांच्या सेवेसाठी गडचिरोली पोलीस दलाचा पुढाकार ; सहायक उपकरणे तपासणी शिबिर यशस्वी
The गडविश्व
गडचिरोली दि. १२ : गडचिरोली पोलीस दलाने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक उपकरणे तपासणी शिबिराचे आयोजन केले. भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून भारत कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय शिबिरात जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील तब्बल 1300 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 207 ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आला.
गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजु आदिवासी नागरिकांना मिळावा, यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सुरक्षित, जीवनमान अधिक सुलभ व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहचविणे, गरजू ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करुन देणे आणि त्यांचे जीवनमान सुसह्र व्हावे या उदात्त हेतूने पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली काल 11 सप्टेंबर 2025 रोजी एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे तसेच आज 12 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस उप-मुख्यालय, प्राणहिता येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक उपकरणे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय पथकाने वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणींची तपासणी केली. ज्येष्ठांना व्हीलचेअर, वॉकर, श्रवणयंत्र, काठ्या, कुबड्या, कमरेचे पट्टे आदी सहाय्यक उपकरणांचे मोफत वितरण लवकरच करण्यात येणार आहे.
शिबिरादरम्यान संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, आयुष्यमान भारत कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.
या वेळी ज्येष्ठांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल म्हणाले, “ज्येष्ठांना आवश्यक असलेली सहाय्यक उपकरणे दिल्याने त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार असून, दुर्गम भागातील प्रत्येक वृद्धापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी पोलीस दल सदैव प्रयत्नशील आहे.”
कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनिल मडावी, जिल्हा रुग्णालयाचे ऑडिओलॉजिस्ट डॉ. संदिप मोटघरे, एलिम्को मुंबईचे डॉ. संकेत डेरवणकर, ऑर्थोटिक्स अँड प्रोस्थेटिक्स तज्ञ हर्ष विश्रवकर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस पोस्टांचे अधिकारी-अंमलदार, नागरी कृती शाखा तसेच पोउपनि. चंद्रकांत शेळके आणि पथकाने विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice ##Gadchiroli #PoliceInitiative #SeniorCitizens #NationalVayoshreeScheme #ELIMCO #HealthCamp #AssistiveDevices #SocialWelfare #FreeSupport #DistrictLevelProgram
#गडचिरोली #पोलीस_उपक्रम #ज्येष्ठ_नागरिक #राष्ट्रीय_वयोश्री_योजना #एलिम्को #आरोग्य_शिबिर #सहायक_उपकरणे #सामाजिक_कल्याण #मोफत_सहाय्य #जिल्हास्तरीय_कार्यक्रम













