गडचिरोलीत पंचायत राज अभियानाची जोरदार तयारी ; ग्रामपंचायतींना कोट्यवधींची बक्षिसे जिंकण्याची संधी
– सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि.१२ : “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेऊन गावांचा विकास साधावा,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केले. समाजकल्याण सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.
राज्यात १७ ते ३० सप्टेंबरदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार असून, यामध्ये गावोगावी लोकसहभागातून विकासकामे राबवली जाणार आहेत. यातील सर्वोत्तम ग्रामपंचायतींना राज्य, विभाग, जिल्हा व पंचायत स्तरावर ५ कोटींपर्यंतची पारितोषिके मिळणार आहेत.
कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी गावातील संसाधनांचा योग्य वापर करून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन केले. समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांनी “सरपंच जबाबदारीने काम केल्यास गावाचा कायापालट शक्य आहे” असे सांगितले. तर नायब तहसिलदार चंदु प्रधान यांनी पांदन रस्ते व लोकसहभागातून झालेल्या कामांचा आढावा घेत, महसूल विभागाच्या वतीने सहकार्याचे आश्वासन दिले.
या कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी लिलाधर बेडके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारांचे स्वरूप (२०२५):
ग्रामपंचायत स्तर – प्रथम : १५ लाख, द्वितीय : १२ लाख, तृतीय : ८ लाख
जिल्हास्तर – प्रथम : ५० लाख, द्वितीय : ३० लाख, तृतीय : २० लाख
विभागस्तर – प्रथम : १ कोटी, द्वितीय : ८० लाख, तृतीय : ६० लाख
राज्यस्तर – प्रथम : ५ कोटी, द्वितीय : ३ कोटी, तृतीय : २ कोटी
अभियानाचे मुख्य घटक – सुशासनयुक्त व सक्षम पंचायत, जलसमृद्ध गाव, स्वच्छता व हरित उपक्रम, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, सामाजिक न्याय, आजीविका विकास, लोकसहभाग व श्रमदानातून नाविन्यपूर्ण उपक्रम.
#thegadvishva #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #गडचिरोली #पंचायतराज #मुख्यमंत्रीअभियान #ग्रामविकास #कार्यशाळा #पुरस्कार #ग्रामपंचायत #विकास #लोकसहभाग #महाराष्ट्र













