गडचिरोली : अभियानावरून जवान येतांना नक्षल्यांनी घडवून आणला आयईडी स्फोट…

4036

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील धोडराज येथून अभियनावरून परत येत असलेल्या सी ६० जवानांवर नक्षल्यांनी आयईडी स्फोट करून हल्ला केला. यात दोन जवान जखमी झाले आहेत. सदर घटनेने परिसरात पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली पोलिस दलाचे सी ६० जवान हे रस्त्यावर शोध अभियान करत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ नक्षल्यांनी लोखंडी क्लेमोर ने स्फोट केला. यात दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत. दरम्यान जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षल्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. परिसरात पोलीस दलाकडून तीव्र शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस दलाकडून प्राप्त झाली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalattack)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here