The गडविश्व
गडचिरोली, ९ सप्टेंबर : शहरातील फुले वार्डात विवाहित माहिलेने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना गडचिरोली शहरातील फुले वार्डात शनिवार 9 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली. सुवर्णा ऋषी कोटवार (२५) रा. चक बल्लापूर जि. चंदपूर असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा कोटेवार हिचे माहेर पोंभुर्णा तालुक्यातील बल्लारपूर चक हे असुन तिचे आठ वर्षापूर्वी सिंदेवाही तालुक्यातील पाथरी परिसरातील तरूणाशी लग्न झाले होते. तिला पाच वर्षाचा मुलगा आहे. ती पतीपासून वेगळ राहत होती. मुलगा पतीकडेच राहतो ती कुठे राहते हे तिच्या वडीलांना माहित नव्हते असे कळत असून ती गडचिरोली येथे सहा महिन्यांपूर्वी आली होती असे कळते. ति एका दुकानामध्ये काही दिवस काम केले. फुले वार्डातील खोली भाडयाने घेवून ती राहत होती. दरम्यान तिने आज गळफास घेत जिवनयात्रा संपविली. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली असता घटनास्थळ गाठून पंचनाम केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविला. गळफास घेण्याचे कारण अदयाप कळु शकले नाही. पुढील तपासा ठाणेदार अरूण फेगडे करीत आहे.
(the gdv, the gadvishva, gachiroli news, crime news, gadchiroli)