गडचिरोली : विवाहित इसम शेतशिवारातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

1155

– कारण गुलदस्त्यात
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ९ जून : नदी पार करून इतराच्या शेतशिवारातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत कुंभिटोला येथील बालकदास लवाजी अंबादे (५५ ) आज शुक्रवार ९ जून रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली.
मृतक बालकदास अंबादे हे गुरुवार ८ जून रोजी घरातून निघाले होते अशी माहिती आहे. मात्र दिवस लोटूनही घरी न परतल्याने कुटुंबातील व्यक्तींनी शोधाशोध केली मात्र कुठेही आढळून आले नाही. शुक्रवार ला पुन्हा शोधाशोध केली असता कुंभिटोला पासून जवळच असलेल्या नदी पार मालदुगी क्षेत्रातील इतराच्या शेतशिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत शेळी चारणाऱ्याच्या लक्षात आले. लागलीच माहिती कुटुंबातील व्यक्तीपर्यंत पोचताच घटनास्थळी दाखल होत कुरखेडा पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पोलीस ठाणे कुरखेडा येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे. सदर इसमाने गळफास का घेतला ? हत्या की आत्महत्या याचा उलगडा अद्याप तरी लागलेला नाही. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here