गडचिरोली : दोन वेगवेगळ्या कारवाईत दारुसह २६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

1613

– आचार संहितेच्या कालावधीत १६ मार्च ते आजपर्यंत १.८२ कोटी रु. दारु व मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जात असतांना दोन वेगवेगळ्या कारवाई दरम्यान देशी विदेशी दारूसह तब्बल २६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलीस दालने केली आहे. या कारवाईने अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­ऱ्यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये ०९ मे रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे मोकळ्या जागेत रोडवर एम.एच ३१ सिपी ३८२६ क्रमांकाच्या चारचाकी वाहणामधे देशी विदेशी दारू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी तत्कालीन प्रभारी अधिकारी पोउपनि. बालाजी लोसरवार यांच्या नेतृत्वात एक पथक सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. वाहनजवळ पोलीस पथक गेले असता सदर वाहनाजवळ असलेले दोन इसम पोस्टे स्टाफला पाहून पळून गेले. वाहनाची झडती घेतली असता ३ लाख ४९ हजारांचा देशी विदेशी दारुसाठा आढळून आला तसेच सदर वाहन किंमत अंदाजे ४ लाख असा एकूण ७ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्रात अज्ञात दोन इसम हे घटनास्थळावरुन फरार झाले असून पोलीस स्टेशन चामोर्शी येथे सदर अज्ञात चालक मालकाविरुद्ध कलम 65 (अ), 98, 83 म.दा.का. अन्वये पोस्टे चामोर्शी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्रातील पुढील तपास मपोउपनि. राधा शिंदे करीत आहेत.
तसेच १० मे रोजी पोलीस स्टेशन आष्टी हद्दीमध्ये गोंडपिपरीकडून घाटकूर मार्गाने आष्टीकडे एका चारचाकी वाहनाने दारुची वाहतुक होणार आहे. अशी आष्टीचे प्रभारी अधिकारी विशाल काळे यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोउपनि. दयाल व पोस्टे स्टाफ हे आष्टी येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयाजवळ योग्य बॅरेकेटींग करुन रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसले. दरम्यान संशयास्पदरित्या येत असलेल्या चारचाकी वाहनास पोस्टे स्टाफ यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता मात्र वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने चालवुन बॅरेकेटींगला धडक मारुन पोस्टे स्टाफ ला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन आणत चामोर्शी मार्गाने पळून गेले. सदर वाहनाचा पाठलाग करून सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यालय, चामोर्शी जवळील मुख्य सिमेंट रोडवर लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान त्यांना ताब्यात घेतले. यावेळी नितेश वशिष्ट चंदनखेडे (वय ३४ ) व्यवसाय- चालक रा. नागसेन नगर, भद्रावती, जि. चंद्रपूर व निखील राजु क्षिरसागर (वय २१ ), धंदा-मजूरी रा. गवराळा, गणपती वार्ड, भद्रावती जि. चंद्रपूर असे सांगितले असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नाव असून वाहनाची झडती घेतली असता वाहनात देशी विदेशी दारू साठा आढळून आला असता तो जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला दारू साठा, मोबाईल, तसेच वाहन असा एकूण १९ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. अतुल तराळे करीत आहेत.
अशा दोन्ही विभिन्न गुन्ह्रामध्ये चामोर्शी व आष्टी पोलीसांनी देशी व विदेशी दारुसह एकुण २६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
१६ मार्च २०१४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ ची आचारसंहिता सुरु झाली. दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्रामध्ये बाहेरुन येणाऱ्या अवैध दारु वाहतुकीवरती आळा घालण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये आचारसंहिता सुरु झाल्यापासुन ते आजपर्यंत एकुण १.८२ कोटी रुपये किंमतीची देशी/विदेशी दारु व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या कार्यवाह्रा पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here