– विविध चकमकीत होता सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने विशेष अभियान राबवून सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला नक्षलीस २५ फेब्रुवारी रोजी अटक केली. राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा ( वय ३०), रा. बडा काकलेर, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) असे अटक करण्यात आलेल्या महिला नक्षलीचे नाव आहे.
फेब्राुवारी ते मे महिन्यादरम्यान नक्षली टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने विशेष अभियान राबवून महिला नक्षली राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिला एप्रिल २०२३ मध्ये मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे कलम 307, 353, 143, 147, 148, 120 (ब) भादवि. सहकलम 3/25, 5/28, 8/27 भाहका, 3, 4 भास्फोका, 13, 16, 18 (अ), 20 बे. कृ. प्र. अटक करण्यात आली आहे.
राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हीचा ३० एप्रिल २०२३ रोजी मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता ज्यामध्ये ०३ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. तसेच पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) येथील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग असून तिला सदर चकमकीच्या अनुषंगाने दाखल पोस्टे तोयनार येथे दाखल कलम 307, 147, 148, 149, भादंवि. सहकलम 25, 27 भाहका मध्ये सन 2019 मध्ये अटक करण्यात आली होती.
असा होता दलमधील कार्यकाळ
– २००६ मध्ये चेतना नाट्यमंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रीय झाली.
– २०१०-११ मध्ये चेतना नाट्य मंचामध्ये उप-कमांडर या पदावर पदोन्नती झाली.
– २०१६ मध्ये फरसेगड दलममध्ये बदली होऊन २०१९ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.
-२०१९ ला पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) च्या जंगल परिसरात पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.
– २०२० मध्ये कारागृहातुन सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी अंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत होती.
४ चकमकीत सहभाग
– २०१६ मध्ये मौजा कर्रेमर्का, फरसेगड (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेली चकमक.
– २०१६ मध्ये मौजा मरेवाडा, भोपालपट्टनम (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेली चकमक.
– २०१८ मध्ये मौजा कचलाराम, बीजापूर (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेली चकमक.
– २०२३ मध्ये मौजा केडमारा, (भामरागड, जि. गडचिरोली) जंगल परिसरात गडचिरोली पोलीसांसोबत झालेली चकमक.
महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर ६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
विविध चकमकीत सहभाग असलेल्या छत्तीसगडच्या महिला नक्षलीस #गडचिरोली पोलीस दलाने केली अटक
– महाराष्ट्र शासनाने तिच्यावर ६ लाखांचे बक्षिस केले होते जाहीर#gadchirolipolice #gadchirolinews #thegdv #गडचिरोली_पोलीस_दल@SP_GADCHIROLI pic.twitter.com/Vg2GjH2gkM— THE GADVISHVA (@gadvishva) February 26, 2024
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७३ नक्षल्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षल्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
(#thegadvishva #12exam #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpuenews #संकल्प_विकास_यात्रा #sankalpviksasyatra #dhanora #bhamragad #naxalarrest )