गडचिरोली : घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक

1156

– सुदैवाने जीवितहानी टळली
The गडविश्व
गडचिरोली, १८ फेब्रुवारी : घरात आलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना सिरोंचा तालुका मुख्यलयापासून जवळच असलेल्या नगरम येथे गुरुवारी घडली. सदर घटनेदरम्यान कुटुंब घरात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
सिरोंचा पासून जवळच असलेल्या नगरम येथील श्रीधर कोडीवार हे आपल्या कुटुंबासह बाहेर गावाला गेले होते. दरम्यान गुरुवारी रात्रोच्या सुमारास घरी कोणी नसतांना त्यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा एकाएकी स्फोट झाला. स्फोट भीषण असल्याने संपूर्ण घराला आग लागली यात घरातील जीवनावश्यक साहित्यही जळून खाक झाले. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी तत्काळ सिरोंचा न.पं अग्निशमन विभागाला दिली. मात्र अग्निशमन दल घटनास्थळापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. मात्र सदर घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही यामुळे मोठा अनर्थ टळला असून यात मात्र कोडीवार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोडीवार कुटुंबाला शासनातर्फे लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी असगी मागणी नागरिकांकडून होत आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Karachi J-Hope) (Mahashivratri 2023) (Barcelona vs Man United) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (12th Exam) (10th Exam)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here