व्येंकटापूर येथे महाशिवरात्री निमीत्त महाप्रसादचे वितरण

157

– जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व पं.स.समिती माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्या तर्फे महाप्रसाद वितरण
The गडविश्व
अहेरी, १८ फेब्रुवारी : तालुक्यातील प्रसिध्द बालाजी देवस्थान व्येंकटापूर येथे महाशिवरात्री ला दरवर्षी जत्रा भरत असते. गेल्या काही वर्षापासून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार व त्याच्या आप्त परिवाराकडुन स्व.रामयाजी कंकडालवार यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ महाप्रसाद वितरण करण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार, आई श्रीमती मंदाताई कंकडालवार, इंदारामचे उपसरपंच वैभव कंकडालवार, सौ.स्मिता कंकडालवार, युवराज अजय कंकडालवार, विराज अजय कंकडालवार, ऋतुराज वैभव कंकडालवार, विद्वि वैभव कंकडालवार, माजी जि. प.सदस्य अजय नैताम, आवलमरी सरपंचां सौ.सुनंदा कोडापे, उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार, सदस्य वसंत तोर्रेम, सदस्य कमलाबाई आत्राम, सदस्य झाडे भाऊ, पांगळे पोलीस पाटील, व्येकना कोडापे, पुजारी काका, परकीवर काका, वासुदेव सिडाम, बंडूभाऊ मुरमाडे व आवलमरी गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिवारात्रि निमित्य आलेले भक्त गण तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here