गडचिरोली : दोन संशयीतांकडुन तब्बल २७ लाख ६२ हजार रुपये जप्त

3117

– गडचिरोली पोलीस दलाची कामगिरी
The गडविश्व
गडचिरोली, ५ जुलै : मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे अहेरी येथे नाकाबंदी दरम्यान २ संशयीत ईसमाकडुन २७ लाख ६२ हजार रुपयाचे बेकायदेशीर रक्कम ५ जुलै रोजी जप्त करण्यात आली. रोहीत मंगु कोरसा (२४) रा. धोड्डर ता. एटापल्ली जि. गडचिरोली, बिप्लव गितीश सिकदार (२४) रा. पानावर जि. कांकेर (छ. ग.) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांची नावे आहेत.
भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२३ नंतर २ हजार रु. च्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्यामुळे नागरिक सध्या २ हजार रु. च्या नोटा बँकेतून बदलून घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर माओवाद्यांनी बेकायदेशीर रित्या जमवलेले पैसे ते लोकांच्या माध्यमातुन वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलवुन घेत आहेत. बऱ्याच ठिकाणी माओवाद्यांच्या या रक्कमा जप्त केल्या गेल्या आहे.
ताब्यात घेतलेले दोघे संशयित इसम हे दुचाकीने जात असतांना नाकाबंदी दरम्यान विचारपुस केली असता त्यांच्याजवळ २ हजार रुपयांच्या ६०७ नोटा एकूण रक्कम १२,१४,०००/- रु. ५०० रु.३०७२ नोटा एकुण रक्कम १५, ३६, ०००/- रु. २०० रु. ७ नोटा एकुण रक्कम १४००/- रु. व १००रु.१०६ नोटा एकुण रक्कम १०,६००/- रु. असे मिळुन २७, ६२,०००/- ( सत्ताविस लाख बासष्ट हजार रुपये) त्यांच्या जवळुन मिळुन आले. एवढ्या मोठ्या रक्कमेबाबत विचारपुस केली असता त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. अधिक विचारपुस केली असता अशी माहिती मिळुन आली की, ही रक्कम भारत सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे असुन त्यातील २ हजार रुपयाच्या नोटा बदलविण्यासाठी दिले गेले आहेत. मिळून आलेल्या दोन्ही इसमांवर यूएपीए अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
माओवाद्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडु नका व कोणी बेकायदेशीर २ हजार रु. च्या नोटा बदलविण्यासाठी सांगत असले तर जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमके ला संपर्क करावा असे आवाहन गडचिरोली पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा. तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी शयतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here