गडचिरोली-चामोर्शी मार्गावर अपघात : भरधाव कारची बैलाला जबर धडक

2016

– चामोर्शी मार्गावरील पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य
The गडविश्व
गडचिरोली, १२ जुलै : जिल्हा मुख्यालयातील चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळ मुख्य मार्गावर रस्ता दुभाजकाच्या कडेला बसुन असलेल्या बैलाला भरधाव चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना बुधवार १२ जुलै रोजी रात्रो ८ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३३ व्ही ००४१ क्रमांकाची चारचाकी वाहन गडचिरोली शहरातून चामोर्शी मार्गे भरधाव जात असतांना शासकीय विज्ञान महाविद्यालयानजीक रस्ता दुभाजकाच्या कडेला बसुन असलेल्या बैलाला जबर धडक दिली. चारचाकी वाहन भरधाव वेगात असल्याने बैलाला धडक देत बैलावरून गेल्याने पलटी होता होता बचावली. दरम्यान चारचाकी वाहनाचे समोरील दोन्ही एअरबॅग फुटल्या. तर चालक हा किरकोळ जखमी झाला असुन यात बातमी लिहीस्तव बैलही गंभीर जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर असा पसरला अंधार

चामोर्शी मार्गावर अंधाराचे सांम्राज्य

चामोर्शी मार्गावरील पथदिवे बंद असल्याने या मार्गावर अंधाराचे सांम्राज्य निर्माण झाले आहे. तर अंधारामुळे प्रवास करतांना काहीही दिसेनासे होत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

शहरात मोकाट जनावरे फिरत असल्याने त्यामुळेही अपघात घडत आहेत. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता काही महिन्यांपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आदेश देण्यात आले होते मात्र सदर आदेश धुळखात असतांना दिसत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, chamorshi road car accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here