गडचिरोली : हिरापूर येथील ७ युवकांनी एकसाथ पोलीस भरतीमध्ये मारली बाजी

3566

– गावात आनंदोत्सव, निवड झाल्याने गौरव
The गडविश्व
गडचिरोली, १५ एप्रिल : गडचिरोली जिल्हा पोलीस दलात तालुक्यातील हिरापूर येथील ७ युवकांनी एकसाथ बाजी मारत इतिहास घडवला आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या मेहनतीने गावातीलच वाचनालयात अभ्यास करून व गावातच मैदानी सराव करून युवकांनी हे शिखर गाठले. शुक्रवार १४ एप्रिल २०२३ रोजी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती सार्वजनिक वाचनालय हिरापूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी  गडचिरोली पोलीस दलात निवड झालेल्या सातही यशस्वी उमेदवारांचा गौरव करून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिरापूरचे वनरक्षक गुरुदास वाढई, प्लॅटिनम जुबली हायस्कूलचे शिक्षक कांबळे तसेच पुष्पक सेलोकर, पद्माकर देशमुख कनिष्ठ लिपिक जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोली, जितेंद्र निसार आरोग्य सेवक भंडारा, सुनील ठाकरे महाराष्ट्र पोलीस गडचिरोली हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी हिरापूर येथील युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन  ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले तसेच संपूर्ण युवकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. गावातील सात युवक एकाचवेळी गडचिरोली पोलीस दलात निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण असून येथील युवकांनी इतिहास घडवला आहे. त्यांच्या या यशाने गावाला नवी ओळख प्राप्त होणार असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

(the gadvishva) (the gdv) (gadchiroli hirapur police bharti 2022)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here