सावली : रानटी डुक्कर आडवा आल्याने अपघात, ३ वर्षीय बालकासह तिघेजण गंभीर जखमी

205

– निमगाव-विरखल मार्गावरील घटना
The गडविश्व
ता.प्र / सावली, १५ एप्रिल : लग्नकार्यक्रम आटोपून दुचाकीने येत असताना विरखल नजीक अचानकपणे रानटी डुक्कर आल्याने झालेल्या अपघातात ३ वर्षीय बालकासह तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी सावली तालुक्यातील विरखल नजीक रात्रो ८ वाजताच्या सुमारास घडली.
मोरेश्वर रोहनकार रा.खामौशी (४९ ), समीक्षा आनंदराव मलोडे रा. विरखल (१५), वृशभ मोरेश्वर रोहनकार (३) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, निमगाव येथून लग्नकार्य आटोपुन विरखल येथे सदर जखमी दुचाकी वाहनाने येत होते. दरम्यान विरखल नजीक रस्त्यावर अचानकपणे रानटी डुक्कर आडवा आल्याने अपघात झाला. यात तिघेहीजण गंभीर जखमी झाले. जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.
सध्या स्थितीत परिसरात मकई ची लागवड करण्यात आली आहे. रानटी डुक्कर गावाच्या दिशेने शेतपिकांवर डल्ला करण्याकरीता येत असतात. अनेकांच्या शेतातील शेतपिकांचे रानटी डुक्कर नुकसान करत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा याबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होते असते, तसेच नुकसान झाल्यास नुकसान भरपाई अत्यल्प मिळत असल्याने शेतकरी भरडला जातो. रानटी डुक्कर गावाच्या दिशेने आल्याने मानवावर हल्ले तसेच अशाप्रकारचे अपघात घडत असतात. त्यामुळे आता तरी झालेल्या अपघाताची दखल घेत वनविभाग रानटी डुकरांचा बंदोबस्त करणार काय असा सवाल परिसरातील नागरिक करत आहे.

(The gadvishva) (the gdv) (sawali) (Sawli: Accident due to wild boar, 3 people including 3 year old child seriously injured)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here