– जिल्हयात वन्यप्राण्यांच्या शिकारी वाढल्या
The गडविश्व
गडचिरोली,दि. १३ : जिल्हयातील घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा वावर असुन वन्यप्राण्यांच्या शिकारीमध्ये वाढ होतांना दिसत आहे. जिल्हयातील आलापल्ली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पेडीगुडम वन परिक्षेत्रातील चंदनवेली जंगल परिसरात अस्वलाची शिकारा करून मासाची विल्हेवाट लावत असतांना एकन वेळी वनविभागाच्या पथकाने धाड टाकून अस्वलाचे मास, डोके व पाय जप्त केल्याची कारवाई चार दिवसांपूर्वी करण्यात आली. याप्रकरणी वनविभागाने ७ जणांना अटक करण्यात आली.
आलापल्ली वनविभागाअंतर्गत येत असलेल्या पेडीगुडम वन परिक्षेत्रातील चंदनेवली जंगल परिसरात गेडा गावातील काही लोकांनी अस्वलाची शिकार करून मासाची विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती वनविभागला मिळताच सदर माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पथकाने गेदा गावात छापा टाकला असता शिकार करणाऱ्यांना वनविभागाची चाहुल लागताच गावातून पळ काढला. दरम्यान वनविभागाने पथकाने गस्त घालुन पहाटेच्या सुमारास आरोपींना डब्बा पोहचविणाऱ्या एका व्यक्तीला पकडले व 10 जून रोजी पथकाने घटनास्थळी पोहचून तपासणी केली केली असता नाल्याच्या काठावर मचान तयार करून काही लोक जनावराचे मास शिजवितांना दिसून आले. तसेच मचानच्या बाजूला अस्वलाचे डोके व पाय लटकलेेले दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #Mohan Majhi #iOS 18 #PAK vs CAN #Malawi #Andhra Pradesh Chandrababu Naidu #Darshan news #South Africa vs Bangladesh