गडचिरोली : रोजगार मेळाव्यातून ११७ युवक-युवतींना मिळाला नवीन रोजगार

138

– गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गतन“रोजगार मेळाव्याचे” आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : जिल्हयातील गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडाण अंतर्गत पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रातील बेरोजगार युवक-युवतींकरीता गडचिरोली पोलीस दल, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव, अमर सेवा मंडळ नागपूर आणि एसआयएस कंपनी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० जून रोजी “रोजगार मेळाव्याचे” आयोजन पोलीस मुख्यायल परिसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले. या मेळाव्यातून ११७ युवक-युवतींना मिळाला नवीन रोजगार मिळाला आहे.
सदर रोजगार मेळाव्याकरिता ५ ते ९ जून २०२४ पर्यंत कुरखेडा, धानोरा, गडचिरोली, कारवाफा, हेडरी, एटापल्ली, भामरागड, अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा येथे उपविभागीय स्तरावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये दुर्गम-अतिदुर्गम भागातील विविध प्रकारच्या रोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ७०० च्या वर बेरोजगार युवक-युवती सहभागी झाले होते. यामधून आज पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव यांचे मार्फत हॉटेल मॅनेजमेंट- 20, आटोमोबाईल- 15, इलेक्ट्रीशिअन- 15, नर्सींग असीस्टंट – 30 तसेच अमर सेवा मंडळ नागपूर यांचे मार्फत आयटी हार्डवेअर व टिव्ही असेंब्ली ऑपरेटर करीता 20 व एसआयएस कंपनी चंद्रपूर यांचे मार्फत सिक्युरिटी गार्ड करिता 77 अशा एकुण 177 उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. विविध प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना अपर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचवावे.
आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 670, नर्सिंग असिस्टंट 1262, हॉस्पीटॅलीटी 363, ऑटोमोबाईल 361, इलेक्ट्रीशिअन 268, प्लंम्बींग 35, वेल्डींग 38, जनरल डयुटी असिस्टंट 403, फील्ड ऑफीसर 11 व व्हीएलई 52, सेल्समॅन 5, वेब डेव्हलपर 30, टीव्ही असेंब्ली ऑपरेटर 60 सॉफ्टवेअर डेव्हलपर 120, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 1462 व किसान मोटर्स 155 असे एकुण 5265 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 274, मत्स्यपालन 147, कुक्कुटपालन 662, बदक पालन 140, वराहपालन 10, शेळीपालन 247, शिवणकला 277, मधुमक्षिका पालन 63, फोटोग्राफी 100, भाजीपाला लागवड 1843, मोटर मेकॅनिकल प्रशिक्षण 129, फास्ट फुड 197, पापड लोणचे 121, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 1110, एमएससीआयटी 231, कराटे प्रशिक्षण 48, ज्युट प्रोडक्ट 35, केक 62 व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण 70, सिसिटीव्ही कॅमेरा 25 असे एकुण 5619 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळावा कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव येथील संस्था प्रमुख आशिष इंगळे, ट्रेनर श्री. श्याम महींगे, ट्रेनर किशोर काळे, मोबलायझेशन एसआयएस (सिक्युरिटी) चंद्रपूर चंदु कारसुरपे व संगम धांडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here