चकमक, खून, जाळपोळीमध्ये सहभाग असलेल्या जहाल नक्षल्याचे आत्मसमर्पण

1766

– शासनाने जाहिर केले होते एकुण ०२ लाख रूपयाचे बक्षिस
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : तीन चकमकी, चार खून, चार जाळपोळ व इतर दोन गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेला जहाल नक्षली किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके (वय ३७) रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर १० जून रोजी आत्मसमर्पण केले. त्याच्यावर शासनाने जाहिर ०२ लाख रूपयाचे बक्षिस जाहीर केले होते.
शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 663 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

आत्मसमर्पित जहाल नक्षली किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके याची कारकीर्द

२०१४ मध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून (भामरागड दलम) मध्ये भरती होवून सन २०१५ पर्यंत कार्यरत होता.
त्यानंतर डीएकेएमएस (दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना) मध्ये अध्यक्ष पदावर पदोन्नती होवून २०१८ पर्यंत कार्यरत. २०१८ मध्ये आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) सदस्य म्हणून २०२२ पर्यंत कार्यरत. पुढे भामरागड दलम सदस्य व आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) चा अध्यक्ष पदावर पदोन्नती होवून आजपर्यंत कार्यरत होता.
त्याचा २०१७ मध्ये दरबा पहाडी, २०२१ मधे कोपर्शी जंगल व २०२२ मध्ये पेनगुंडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
तर २०१५ मध्ये मल्लमपड्डूर तलावाजवळील रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता तसेच २०१८ मध्ये गोंगवाडा टी-पॉइंट जवळ झालेल्या एका निरपराध महिलेच्या खूनात, मध्ये जूवी नाल्याजवळ झालेल्या एका निरपराध इसमाच्या खूनात, २०२३ पेनगुंडा ते गोंगवाडाकडे जाणाऱ्या कच्या रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
२०२१ मध्ये मरकनार ते मुरुमभूशी रोड जंगल परिसरात वाहनांची जाळपोळ, २०२२ मध्ये बोटनफुंडी ते विसामुंडी रोड जंगल परिसरात वाहनांची जाळपोळ, २०२२ मध्ये मौजा पेनगुंडा रोड जंगल परिसरात जेसीबी व ट्रॅक्टर वाहनांची जाळपोळ, २०२३ मध्ये हिद्दुर गावाजवळ रोड कामावरील ४ (१ जेसीबी, ३ ट्रॅक्टर) वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
२०२१ मध्ये कोठी ते कोठी टोला रोडवर माओवादी बॅनर व पत्रके लावण्यात, २०२३ मध्ये नेलगुंडा जंगल परिसरात जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके याला एकुण ४ लाख ५० हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण १५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ जगदीश मीणा, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ एम.एच. खोब्राागडे, पोलीस अधीक्षक, विशेष कृती दल नागपूर संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर श्रीमती. ज्योत्स्ना मसराम, सपोनि. जितेंद्र वैरागडे, पोहवा/प्रमोद पुरी सह सीआरपीएफ 37 बटा. बी-कंपणीने पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalsurender #bhamragad)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here