उद्या खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षार्थींना मोफत पुस्तके
– रक्तदान शिबिराचेही आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि. १९ जुलै) रोजी विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात पार पडणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना प्रोत्साहन मिळावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास साहित्य विनामूल्य उपलब्ध व्हावे आणि स्पर्धा परीक्षांकडे अधिकाधिक युवकांनी वळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षा पुस्तकांसाठी पूर्वनोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थी, युवक-युवतींनी सकाळी ९ वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, युवक-युवतींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन खासदार डॉ. नामदेव किरसान मित्रपरिवार व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.













