दुचाकी अपघातातील जखमींची माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रुग्णालयात घेतली भेट

107

The गडविश्व
अहेरी, २२ फेब्रुवारी : आलापल्ली पासून ६ किमी अंतरावर दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना २१फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य झाला व दोघेजण गंभीर जखमी झाले.
बहादूर आत्राम (४२) रा. भामरागड असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून करण अर्का व राजेश आलाम असे जखमींची नावे आहेत.
सदर अपघाताची माहिती स्वराज्य फाउंडेशनला मिळाली असता लगेच स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल होत अपघातात गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले.
सदर घटनेची माहिती माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना मिळताच त्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस केले. व अपघातात मृत्यू झालेल्या बहादूर आत्राम यांचे शवविच्छेदन करून अहेरी नगरपंचायतचे स्वर्गरथ बोलावून मृतदेह स्वागावी भामरागडला पाठवण्यात आले.
यावेळी उपस्थित विष्णू मडावी नगरपंचायत उपाध्यक्ष भामरागड, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, नरेंद्र गर्गम राकेश सडमेकसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here