– ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : ओबीसींच्या विविध मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचा वतीने आंदोलन करून, निवेदन देऊन सरकारला आपल्या मागण्या अवगत करत असते. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ व इतर समविचारी ओबीसी संघटनांच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात राहुल भांडेकर यांच्या नेतृत्वात ओबीसी तरुणांनी ओबीसींच्या विविध मागण्या घेऊन ४ मार्च पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार व अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट देऊन मागण्या सरकार दरबारी लावून धरण्याचे आश्वासन दिले त्यानंतर ८ मार्चला उपोषण स्थगित करण्यात आले.
१३ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले होते त्यांची अंमलबजावणी झालेली नव्हती परंतु ओबीसी युवकांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला ११ मार्च २०२४ रोजी परिपत्रक काढून २०२४-२५ या सत्रात ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्यालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली. तरी ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर, पदम भूरसे, पंकज खोबे, अनुप कोहळे, रमेश कोठारे, अजय सोमनकर, महेंद्र लटारे, मनोज पिपरे, प्रफुल आंबोरकर, रोशन कोहळे, बादल गडपायले, युवती जिल्हाध्यक्ष संतोषी सुत्रपवार, अभिषेक चौधरी, आकाश सोंनटक्के, विनोद किरमे, राहुल वैरागडे, हर्षद भांडेकर, सागर वाढई, तुषार मंगर, ईशान्य भोयर, विक्की सोनुले, पारस फुलझेले, दूषांत कुंनघाडकर, आकाश आंबोरकर, आरमोरी तालुका अध्यक्ष चेतन भोयर, तालुका सचिव हरिष नैताम, जिल्हा सहसचिव मिथुन शेबे, विकेश दुधबळे, आदित्य भांडेकर यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #ajaykankadalwar)