पोलीस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ

2467

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
The गडविश्व
गडचिरोली, २९ नोव्हेंबर : राज्यातील पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या भावी पोलीसांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलास देत पोलीस भरती अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याची घोषणा आज केली आहे. त्यामुळे आता पोलीस भरती अर्ज सादर करण्यास अधिकचे १५ दिवस मिळणार आहे.
राज्यातील पोलीस भरती करीता ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे होते. मात्र सुरूवातीपासूनच अर्ज सादर करण्यास अनेक अडचणी उद्भवत होत्या. कधी संकेतस्थळ कासवगतीने चालत होते तर कधी तांत्रीक अडचणी उदभवत होत्या. अर्ज सादर करण्यास ३० नोव्हेंबर पर्यंत शेवटची तारीख होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पोलीस भरती अर्ज सादर करण्यास मुदवाढ करण्यात आल्याची घोषण केली आहे. आतापर्यंत ११.८० लाख अर्ज ऑनलाईन सादर केल्याची माहिती आहे.

(Extension of time to apply for police recruitment ) (The Gadvishva) (Gadchiroli) Police Bharti) Gadchiroli) (Devendra Fadnvis)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here