ग्रीन गोंडवाना फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. च्या कृषि गोदामाचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

282

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २९ नोव्हेंबर : तालुक्यातील शिवणी बु. येथे ग्रीन गोंडवाना फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. च्या कृषि गोदामाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले.
ग्रीन गोंडवाना फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांनी कृषी विभागाच्या मदतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत कृषी गोदामाची निर्मिती केलेली असुन शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
यावेळी उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या कल्पनाताई तिजारे, भाजयुमो तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, उपविभागीय कृषी अधिकारी वडसा निलेश गेडाम, सरपंच पुरुषोत्तमजी दोंनाडकर, पत्रकार कमलाकर चटारे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुनील नंदनवार, उपसरपंच सुरेश ढोरे, ग्रा.पं.सदस्या गौरीताई बुल्ले, ज्योतीताई बांडे, प्रमिलाताई मेश्राम, पोलिस पाटील शकुंतलाताई पत्रे, तालुका कृषी अधिकारी आरमोरी कु.जे. व्ही. घरत, प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन कृषी पर्यवेक्षक ए. आर. हुकरे , प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वडसा विनोद रहांगडाले, आभार तालुका कृषी अधिकारी आरमोरी कु. जे.व्ही. घरत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहायक नितीन कुंभारे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आरमोरी महेंद्र दोंनाडकर, ग्रीन गोंडवाना शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक बळीराम राऊत, सोमेश्वर राऊत, अरविंद खोब्रागडे, प्रशांत दर्वे, हेमराज खोब्रागडे, भारत राऊत, रामदास राऊत, सारंग राऊत, पुंडलिक चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here