– आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भुमिपुजन
The गडविश्व
कुरखेडा, ३० नोव्हेंबर : शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर आ. गजबे यांनी १२ ट्रॉन्सफार्मर मंजुर करण्यात यश प्राप्त केले असुन या कामांचे भुमिपुजन आमदार कृष्णा गजबे यांच्याहस्ते करण्यात आले.
कुरखेडा शहरातील वीजपुरवठयाची समस्या कायमची दूर करण्यासाठी कुरखेडा येथील भाजपाच्या शिष्ट मंडळाने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे कुरखेडा शहरातील विद्युत समस्या संदर्भात माहिती दिली असता आमदार कृष्णा गजबे यांनी शहरातील विद्युत पुरवठयासंदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी संजय मिणा यांना पत्र देत जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून कुरखेडा शहरातील १२ नवीन ट्रान्सफर लावण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना पत्र दिले व त्यांना ट्रान्सफॉर्म करिता निधी प्रस्तावित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी असे सुद्धा सुचवले होते . याची दखल घेत कुरखेडा शहरात १२ नवीन ट्रॉन्सफरची मागणी पूर्ण झाली असून कुरखेडा शहरात विविध ठिकाणी बारा नवीन ट्रान्सफर लागण्याला सुरुवात झाली आहे. डॉ. महेंद्र कुमार मोहबंसी यांच्या इंडियन पेट्रोल पंपाजवळ आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन सुद्धा करण्यात आले. यावेळी भाजप गट नेते बबलु हुसैनी यांनी आ. कृष्णा गजबे यांचे आभार मानले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपाचे वरिष्ठ नेते गणपत सोनकुसरे, भाजपा शहराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, सभापती ॲड. उमेश वालदे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेंद्र कुमार मोहबन्सी, विद्युत उपकार्यकारी अभियंता मुरकुटे, नगरसेवक सागर निरंकारी, विलास गावंडे, नगरसेवक अशोक कंगाली, भाजयूमो अध्यक्ष विनोद नागपूरकर, उल्हास देशमुख, पुष्पराज राहांगडाले उपस्थित होते.
(The Gadvishva) (MLA krushna Gajbe) (Kurkheda) ( Gadchiroli News Update)