आरमोरी : तालुका काँग्रेस कार्यालयात पिक विमा मदत कक्षाची स्थापना

179

– तालुकाध्यक्ष मिलींद खोब्रागडे यांची माहिती
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, ३० नोव्हेंबर : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे संपूर्ण खरीप हंगाम उध्वस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे हप्ते भरले असताना सुद्धा, अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही. त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने आरमोरी तालुका कार्यालयात “पिक विमा मदत कक्ष” स्थापन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे पण त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपले नाव मोबाईल क्रमांक व पिक विमा भरण्याची पावती (झेरॉक्स), आधार कार्ड ( झेरॉक्स ) हे कागदपत्र तालुका कार्यालयात ४ डिसेंबर २०२२ पूर्वी सादर करावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मिलींद खोब्रागडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाला दिली भेट

आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भौतिक सुविधा बाबत चर्चा केली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here