The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०२३-२४ या सत्रात गडचिरोली जिल्ह्यात रविवार ब१० मार्च २०२४ रोजी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे बाह्य रुग्ण विभागात सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेस आकडी अपस्मार, फिट, मिरगी (इपिलेप्सी) शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर शिबिरादरम्यान तज्ज्ञ न्युरोफिजीशियन मार्फत तपासणी व उपचार, ई.ई.जी, रक्त तपासणी, समुपदेशन, भौतिकोपचार, व्यवसयोपचार, वाचा व भाषा विकार उपचार, ३ महिन्यांची औषधे इत्यादी सुविधा देण्यात येणार आहे. नोंदणी करण्यासाठी संपर्क क्रमांक- ०७१३२-२२२३४०/२२२३२० व आरोग्य विषयक सल्ला व माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १०४ असा आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. प्रमोद खंडाते यांनी कळविले आहे.