मुरुमगाव येथील सिआरपीएफ बटालियन ११३ च्या वतीने नागरिकांना मच्छरदाणी वाटप

115

The गडविश्व
ता.प्र /धानोरा, २३ फेब्रुवारी : तालुक्यातील पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव येथील सिआरपीएफ बटालियन मुरुमगाव ११३ वाहिनी माध्यमातून सिविक ऍक्शन कार्यक्रम अतंर्गत मुरुमगाव, खेडेगाव, बेलगाव येथील गरजवंत १५० नागरिकांना मच्छरदाणी चे वाटप करण्यात आले.
या सिविक ऍक्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष साहाय्यक कमांडेंट शशिभूषन यादव व प्रमुख उपस्थितीत API मिथुन सिरसाट पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव, PI एल.डी.रावत एसआरपिएफमुरुमगाव, PI मोहन सिंग, सि.आर.पी.एफ बटालियन ११३ मुरुमगाव, पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे मुरुमगाव, माजी जि.प.सदस्य सौ.लताताई पूगांटे मुरुमगाव, सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव हे उपस्थित होते.
यावेळी नागरिकांना मच्छरदाणी वाटप करण्यात आले असता नागरिकांनी याचा लाभ घेतला व मच्छरदाणीचा योग्य वापर केला जाईल असे सांगितले. मच्छरदाणी वाटप केल्याने नागरिकांत आनंद व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here