The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०९ : ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिनानिमित्त धानोरा येथील विद्यानगर वार्ड क्रमांक १ च्या विद्यानगर सार्वजनिक महिला मंडळ यांनी ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे डॉ. पल्लवी मडावी यांच्या उपस्थितीत विद्यानगर सार्वजनिक महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यानंतर नगरसेविका वैशाली धाईत यांनी महिलांना महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले तसेच नगरसेविका अल्काताई मशाखेत्री यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन करून महिला दिनाचे महत्व सांगितले. यावेळी नगरसेविका सौं.वैशाली धाईत, नगरसेविका अलकाताई मशाखेत्री, वाघाडे, गीता भोंडे, गंधाटे, वनिता शेंडे, मने, स्वाती पुराम व विद्यानगर वार्डातील महिला उपस्थित होत्या.