येरकड पोलीस मदतकेंद्रात दिव्यांग मेळावा व विविध स्पर्धा

261

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ जानेवारी : तालुका मुख्यालयापासून ९ कि.मी.अंतरावर असलेल्या येरकड पोलीस मदत केंद्रा अंतर्गत आणि दिव्यांग संघटना यांच्या सयुक्त विद्यमाने २५ जानेवारी २०२३ रोजी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंत, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे व धानोरा उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, करवाफा उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी विविध शासकीय योजना ची माहिती देण्यात आली. तसेच यावेळी परिसरातील दिव्यांग व्यक्तीची अडचणीचे निराकरण करण्यासाठी पोलीस मदत केंद्र येरकड प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांच्या संकल्पनेतून पोमके हद्दीतील व धानोरा व विभागीय अंतर्गत येणाऱ्या गावातील दिव्यांग लोकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यात पोमके येरकड हद्दीतील २५ दिव्यांग नागरिक उपस्थित होते. सदर मेळाव्यात पाच दिव्यांगाना गरजेनुसार विविध साहित्य वाटप करण्यात आले.
सदर मेळाव्यात दिव्यांगाच्या ५० मीटर धावणे, रस्सीखेच व संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत भाग घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच पोलीस दल गडचिरोली तर्फे आगामी काळात गडचिरोली येथे दिव्यांग महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी यांनी दिव्यांगासाठी शासनाद्वारे सुरू असलेल्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेव उसेंडी सरपंच ग्रामपंचायत येरकड तर प्रमुख पाहुणे म्हणून जयंत मेश्राम ग्रामसेवक ग्रामपंचायत येरकड, प्रकाश मारबते अध्यक्ष दिव्यांग संघटना धानोरा, अतुल शिंपी येरकड इत्यादी प्रमुख पाहुणे या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आकाश ठाकरे पोलीस उपनिरीक्षक येरकड यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालक अरुण आघाव नापोशी यांनी तर आभार कैलास माळी यांनी मानले.
सदर कार्यक्रमास जिल्हा पोलीस अंमलदार तसेच पोलीस उपनिरीक्षक भागवत एस आर पी एफ अंमलदार तसेच पोलीस मदत केंद्र येरकड मधील सर्व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here