धानोरा : लेखा येथील तोफा यांनी घेतला गळफास

2425

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १५ मे : तालुका मुख्यलयापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या लेखा येथील नरेश तोफा (अंदाजे वय ५५) यांनीझाडाला गळफास घेतल्याची घटना रविवार १४ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त महितीनुसार, लेखा येथील नरेश तोफा हे सकाळी सकाळी १० वाजताच्या सुमारास गावाजवळील तलावानजीकच्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लागले असल्याचे जंगलातून येणाऱ्या लोकांना निदर्शनास आले. घटनेची माहिती लगेच घरातील व्यक्तींना देण्यात आली. तसेच सदर घटनेची माहिती फोन वरून पोलीस स्टेशनला देण्यात आली. वृत्त लिहेस्तव मृतदेह गावातच होता. तोफा यांनी गळफास का घेतला हे अद्याप कळलेले नाही. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. अचानक गळफास घेतल्याने गावात मात्र हळहळ व्यक्त होत आहे. ©©
(©बातमी कॉपी पेस्ट करू नये, कॉपी पेस्ट केल्यास आम्हाला मेल येतो, थोडीफार मेहनत घ्या©)
(the gdv, the gadvishva, gadchiroli dhanora tofa lekha) (Dhanora: Tofa from Lekha hanged himself)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here