The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०३ : धानोरा–छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० वरील वडगाव–ढवळी दरम्यान पडलेल्या खोल खड्ड्यात दोन ट्रक अडकून बसल्याने काल सायंकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून गडचिरोली–मुरूमगाव बससेवा ठप्प झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.
सालेभट्टी ते जपतलाई या सात किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अक्षरशः उखडून गेले असून तीन ते चार फूट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे चारचाकी व दुचाकी चालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. डांबराचा चुरा होऊन रस्ता चिखलमय झाल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे.
या महामार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष गेलेले नाही. “एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यावरच दुरुस्ती सुरू होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तातडीने खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त न केल्यास नागरिक स्वयंप्रेरणेने आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Dhanora #Gadchiroli #NationalHighway930 #TrafficJam #StudentsSuffer #RoadCondition #PublicProtest #TruckStuck
#धानोरा #गडचिरोली #राष्ट्रीयमहामार्ग930 #वाहतूकठप्प #विद्यार्थ्यांचेहाल #रस्त्यांचीदुर्दशा #सार्वजनिकआंदोलन #ट्रकअडकले













