देसाईगंज : ‘रात्रीस खेळ चाले’ वर महसूल विभागाची कारवाई, दोन हायवा ट्रक जप्त

644

– अखेर कुरुड- कोंढाला घाटावर महसूल विभाग पोहचत रेती तस्करांवर कारवाई
The गडविश्व
ता.प्र /देसाईगंज, ८ जून : तालुक्यातील कुरुड-कोंढाळाच्या नदी पात्रातुन राजरोसपणे रात्रोच्या सुमारास (रात्रीस खेळ चाले) अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या रेती तस्करांवर देसाईगंज महसूल विभागाने ६ जून रोजी मध्यरात्री धाड टाकून कारवाई करत दोन हायवा ट्रक जप्त केले. सदर कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
गौणखनिज शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देतो. मात्र या गौणखनिजांची लयलूट केली जात होती. कुरुड-कोंढाळा नदी घाटावरून अनेक दिवसांपासून अंधाराचा फायदा घेत रात्रोच्या सुमारास रेतीची अवैधरित्या उत्खनन करून तस्करी करीत होते. याबाबतचे अनेकदा वृत्त सुद्धा प्रकाशित करण्यात आले होते. मात्र महसूल विभाग त्याकडे कानाडोळा करत होते. अखेर महसूल विभागाला उशिरा का होईना मात्र रात्रोच्या सुमारास जाग येऊन ६ जूनच्या मध्यरात्री नायब तहसीलदार हे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल तसेच इतर सहकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसह कुरुड-कोंढाळा घाटावर दाखल होत कारवाई करत दोन हायवा ट्रक जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ट्रक मध्ये एमएच ३६ एए ५०५७ (वाहक नंदु विस्तारी पसे) व एमएच ३६ एए २५११ (वाहक विनोद रामरतन बावणे) अशी असून कारवाई करिता गेले असता नदीघाटावर जवळपास ५० हायवा ट्रक उभे होते अशी माहिती आहे. यावरून दरदिवशी नदीपात्रातून लाखोंच्या गौनखनिजांची लूट होत असल्याचे लक्षात येते. प्रत्यक्षात नायब तहसीलदार व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहचून कारवाई केल्याने मात्र रेती तस्करांचे धाबे दणाणले असून रेती माफियांचा ‘रात्रीस खेळ चाले’ यावर काही प्रमाणात अंकुश लादण्यात आले असे म्हणता येईल.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, desaiganj, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here