गडचिरोली : महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

1257

– The गडविश्व
गडचिरोली, ८ जून : सायंकाळच्या सुमारास महिला आपले काम संपवून घराकडे जात असतांना जबरजस्ती करून अत्याचार करता जबर मारहाण आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. मिथुन मडावी असे आरोपीचे नाव आहे.
पीडित महिला ही २७ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तिचे काम आटोपुन निर्जन रस्त्याने घरी जात असतांन एका अनोळखी इसमाने तिच्याशी जबरजस्ती करून अत्याचार केला. दरम्यान त्यास प्रतिकार केला असता त्याने तिला जबर मारहाण केली. याबाबत पीडितीने पोलीस ठाणे चामोर्शी येथे तक्रार दाखल केली असता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला उपचाराकरिता महिला व बाल रुग्णलाय, गडचिरोली येथे भरती करून पीडितेची रिपोर्ट व वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन चामोर्शी येथे अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा. यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस स्टेशन, चामोर्शी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ४ पथके तयार करुन आरोपी निष्पन्न करुन अटक करण्याबाबत आदेशित केले. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील महिला अधिकारी सपोनि रुपाली पाटील यांनी पिडीतेची रुग्णालयात भेट घेवुन विचारपुस केली असता संबंधित पिडीतेवर झालेल्या अत्याचारामुळे तीच्यावर मानसिक आघात होवुन ती प्रकरणाची संपुर्ण माहिती देण्यास सक्षम नसल्याचे लक्षात येताच वन स्टॉप सेंटर गडचिरोली येथील समुपदेशक यांच्या मदतीने पिडीतेस विश्वासात घेवुन बोलते केले. पिडीतीने दिलेल्या माहितीवरुन आरोपीचे रेखाचित्रकाराच्या मदतीने रेखाचित्र काढण्यात आले. त्याबाबत पोलीस स्टेशन, चामोर्शी यांनी त्यांचे परीसरातील संशयीत ईसमांकडे तसेच परीसरातील लोकांकडे सखोल विचारपुस केली असता सदर घटना तारीख वेळेपासुन त्या परीसरातील मिथुन मडावी हा इसम फरार असुन त्याचे वर्णन रेखाचित्राशी मिळतेजुळते असल्याचे निष्पन्न होताच पोलीसाचा त्याचेविरुध्दचा संशय बळावला व त्याची शोध मोहिम सुरु करण्यात आली. संबंधित आरोपीचे नातेवाईक असणाऱ्या परीसरात गोपनिय बातमीदारांचे जाळे तयार करण्यात आले. संशयीत आरोपीचा भाऊ हा चंद्रपुर येथे राहत असल्याने चंद्रपुर येथील स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन त्यांना घटनेबाबत व संशयीत आरोपीबाबत माहिती देवुन आरोपीचा शोध घेण्याबाबत विनंती केल्यावरुन गोपनिय बातमीदारांकडुन आरोपी चंद्रपुर येथे असल्याची माहिती मिळताच ०७ जून २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मदतीने संशयीत आरोपीस ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे आणुन संशयीत आरोपीताकडे विचारपुस केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई करीता गुन्ह्याच्या तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ पोस्टे चामोर्शी यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा., तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन चामोर्शी येथील, पोनि उल्हास भुसारी व पोनि विजयानंद पाटील यांचे नेतृत्वात सपोनि रुपाली पाटील, पोउपनि राहुल आव्हाड, पोउपनि दिपक कुंभारे, पोउपनि पल्लवी वाघ, पोउपनि सुधीर साठे, श्रेणी पोउपनि पुरुषोत्तम वाटगुरे, पोना / दिपक लेनगुरे, पोशि/ श्रीकांत बोईना, पोशि/सचिन घुबडे, पोना / अकबर पोयाम, पोशि/ प्रशांत गरफडे, पोशि/ श्रीकृष्ण परचाके, चापोना / शगीर शेख, चापोना / मनोहर टोगरवार, चापोना / माणिक निसार यांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस स्टेशन, चामोर्शी येथील सर्व पोलीस अंमलदार यांनी अहोरात्र परीश्रम घेतले.
(the gadvishva, the gdv, gadchiroli news updates, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here