केडमारा जंगल परिसरातील पोलीस नक्षल चकमकीची दंडाधिकारी चौकशी होणार

1344

The गडविश्व
गडचिरोली, ७ जून : जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र ताडगाव अंतर्गत येत असलेल्या केडमारा जंगल परिसरात ३० एप्रिल २०२३ रोजी झालेल्या पोलीस – नक्षल चकमकीदरम्यान तीन पुरुष मृतदेह सापडल्याचे आदेशात नमूद आहे. सदर घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तीचे/मृतदेहाचे मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने, सदर प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये दंडाधिकारी चौकशी होणार आहे. या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली येथील यांचे न्यायालयात जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून १५ दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत असे उपविभागीय दंडाअधिकारी, एटापल्ली शुभम गुप्ता यांनी कळविले आहे.

चौकशीमध्ये भाग घेण्याकरिता हे मुद्दे आवश्यक

घटनेचे आपण पाहिल्याप्रमाणे वर्णन, आपला या घटने विषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी काही घटना घडली असल्यास त्या विषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे, या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती.

(the gdv, the gadvishva, kedmara firing, tadgao police, gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here