The गडविश्व
देसाईगंज, दि. १६ : तालुक्यातील कोंढाळा येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा व ग्रामीण रुग्णालय, देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३२६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने कोंढाळा येथील पी एम श्री शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य व मानसिक तपासणी केली. या उपक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्री बाई फुले व सरस्वती मातेच्या फोटोला मलाराप्पन करून सुरवात करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हणून सुनील पारधी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते. यावेळी नितेश पाटील,डॉ. विद्या गेडाम, डॉ.प्रणय कोसे, डॉ. प्रेमानंद शेंडे यांचे पुष्पगुच्छ स्वागत करण्यात आले. या वेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाच्या पथकामध्ये निता वानखेडे,वनिता आढव, स्मिता डोंगरे, सुशिता साखरे, प्रिया शिंगाडे यांचा समावेश होता. या पथकाने विद्यार्थ्यांना आहार ग्रहण करण्याची योग्य पद्धत व स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता आणि व्यसनांपासून मुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी त्वचा संदर्भातील विकारांबाबत माहिती देण्यात आली. किरकोळ आजारी विद्यार्थांना आयुष्धीपचार देण्यात आले. यावेळी विद्यार्थांचे ब्लड ग्रुप तापसण्यात आले.
सदर आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मुख्याध्यापक योगेश ढोरे, संतोष टेंभुर्ण, ममता घाटबांधे,माधुरी रमगुंडे,ठवरे,जांभूळकर, प्रवीण शेंडे, सुरेश आदे,अर्चना झिलपे,आरती चौधरी, मोहिनी झिलपे, अविनाश मोथरकर यांचे सहकार्य लाभले.
