देसाईगंज: चोप येथे उदयापासून भागवत सप्ताह

420

– ह.भ.प. शंकररावजी कावळे महाराज यांची अमृतवाणि
The गडविश्व
देसाईगंज, ३० नोव्हेंबर : तालुक्यातील चोप येथे उदया पासून खास दत्त जयंती निमित्त संगितमय श्रीमद भागवत, ग्रामगिता तत्वज्ञान सप्ताहाचे अयोजन करण्यात आले आहे. सदर भागवत उदया गुरूवार १ ते ७ डिसेंबर या कालावधी पर्यंत आयोजीत करण्यात आले आहे.
श्री गुरूदेव सेवा मंडळ तथा चोप वसीयांच्या वतीने उदया १ ते ७ डिसेंबर पर्यंत संगितमय श्रीमद भागवत, ग्रामगिता तत्वज्ञान सप्ताहाचे आयोजन दत्त मंदिराच्या सभागृहात करण्यात आले आहे. या भागवत सप्ताहात नागपूरचे श्री.ह.भ.प. शंकरावजी कावळे महाराज यांच्या अमृतवाणीतुन प्रवचन होणार आहे. सदर भागवत सप्हाहाची सुरूवात उदया १ डिसेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता दिपप्रज्वलाने करण्यात येणार आहे. तर दैनदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ५ वाजता सामुदायिक ध्यान प्रार्थना, सकाळी ७ वाजता रामधुन, ९ ते ११ वातजा प्रवचन ह.भ.प. कावळे महाराज, सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी ७ वाजता हरीपाठ, रात्रो ९ ते ११ वाजता प्रवचन ह.भ.प. कावळे महाराज तर ५ डिसेंबरला दुपारी १ वाजता महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, ७ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता गोपालकाला, सायंकाळी ५ वाजतापासून महाप्रसाद असणार आहे.
या भागवत सप्ताहाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरूदेव सेवा मंडळ, दत्त सांप्रदाय मंडळ, ओम शारदा उत्सव, बाल दुर्गा उत्सव, बाल गणेश उत्सव अणि समस्त गावकरी मंडळींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here