पोलिस व शहर संघटनांच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांवर करणार कारवाई

151

-सिरोंचा मुक्तीपथ तालुका समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली, ३० नोव्हेंबर : सिरोंचा शहरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलीस व विविध वॉर्ड समित्यांच्या समन्वयातून दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुक्तीपथ तालुका समितीच्या बैठकीत करण्यात आला.
सिरोंचा येथील तहसील कार्यालयात मुक्तीपथ तालुका समितीची बैठक नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे होते. यावेळी नायब तहसीलदार एच.एस सय्यद, मांडवगडे, पाझारे, डॉ. अश्विन वाळके, महेश नीलम, डॉ. विकास घोडे, नायब तहसीलदार तोटावार, प्रा.पाटील, डॉ. प्रा. कलोडे, पीएसआय शीतल धविले, विशाल पाटील, सुनीता भगत, शंकर गग्गुरी, साईराम सेनीगारपू आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दारू व तंबाकू बंदीवर चर्चा करण्यात आली. शहरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी सक्रिय समिती तयार करणे. पोलिस व विविध वॉर्ड समित्यांच्या माध्यमातून शहरातील दारू आटोक्यात आणणे. शहरातील पानठेल्याबाबत चर्चा करण्यात आली. गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी विक्रेत्यांवर कारवाई करणे, त्रासदायक गावांमध्ये जनजागृती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here