ग्लासफोर्डपेठा येथील महिला विक्रेत्यावर गुन्हा दाखल

181

-४ हजारांची दारू जप्त
The गडविश्व
गडचिरोली, ३० नोव्हेंबर : बामणी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्लासफोर्डपेठा येथे पोलिस व मुक्तीपथ गाव संघटनेने संयुक्त कृती करीत 4 हजार रुपये किंमतीची विदेशी दारू जप्त केली.याप्रकरणी दारू विक्रेत्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ग्लासफोर्डपेठा गावात मागील 6 महिन्यांपासून अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, गावात कार्यक्रम असल्याने एका महिला विक्रेत्याने चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरू केली होती. यासंदर्भातील माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. त्यानुसार बामणी पोलिस, गाव संघटना व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या सदर महिलेच्या घराची झडती घेतली असता, 5 लिटर गुळाची दारू व विदेशी दारू असा एकूण 4 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई प्रभारी अधिकारी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी जाधव व करूणाकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here