आव्हानांना पेलणारे सामर्थ निर्माण करणारे बालक तयार करा

210

– रांगी येथे शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण कार्यशाळेत मान्यवराचे मत
The गडविश्व
गडविश्व, २२ एप्रिल : शिक्षकांनी बालकांना नियमित प्रमाणे उच्च दर्जाचे शिक्षण देऊन प्रत्येक बालकांमध्ये भविष्यातील आव्हानांना पेलण्याचे सामर्थ निर्माण होणारे बालक तयार करण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन केंद्रस्तरीय प्रशिक्षणामध्ये धानोराचे ज्येष्ठ भाग शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर आखाडे यांनी केले.
मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी पालक समाज व शिक्षक यांच्या समन्वयातून शिक्षणास पोषक वातावरण निर्माण करून शाळेच्या प्रथम दिनीच विद्यार्थी प्रवेश होण्याकरिता शाळा पूर्व तयारी अभियान राबविण्याचे केंद्रस्तरीय प्रशिक्षण रांगी येथे आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आपल्या बालकांनी नियमित व उत्तम शिक्षण घ्यावे त्याची तयारी पक्की व्हावी अशी पालकांची अपेक्षा असते त्यामुळे शाळा पूर्वतयारीच्या माध्यमातून विविध बाबींची माहिती सोबतच शिक्षणाची गोडी वाटने व पुढील शिक्षण घेणे हे सोपे जाते त्याकरिता प्रवेशित बालकाचे प्रारंभिक बाबीचे ज्ञान तपासणी करून त्याला व पालकांना सुलभन कसे करावे याबाबत या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये तयारीचे टप्पे मेळावा, मेळाव्यातील विविध बाबी, प्रत्यक्ष प्रारूप मेळावा आयोजित करण्यात आला कृतीयुक्त सादरीकरणासह या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी नोंद करणे पडताळणे, प्रवेश दिंडी, दवंडी, सभा यासारखे विविध उपक्रम राबविले गेले त्यामुळे मेळाव्याची दिशा सुद्धा प्राप्त झाली.
या प्रशिक्षणामध्ये रांगी केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र लांजेवार यांच्या विशेष मार्गदर्शनात प्रारूप मेळाव्या आयोजन करण्यात येऊन प्रत्यक्ष ७ टेबल द्वारे प्रारूप मेळावा घेण्यात आला. प प्रशिक्षणाचे सुलभक म्हणून योगेश वाढाई, कुमारी वर्षा नाकाडे यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मागील उजळणी सह कृतीयुक्त सुलभन केले तर या प्रशिक्षणामध्ये रांगी केंद्रातील मुख्याध्यापक महेंद्र कुकडकार, गोपाल राऊत यासह कार्यक्रमाला रांगी केंद्रांतर्गत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, स्मार्ट माता उपस्थित होते.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (Bayern vs Man City) (Inter vs Benfica) (JEE MAINs Answer Key) (Mohammed Siraj) (Solar eclipse of April 20, 2023) (Roman Reigns) (Mamata Banerjee) (The Song of Scorpions) (Create a child who builds strength to meet challenges)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here