प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा : माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार

237

– अन्यथा आंदोलन करण्याचा निवेदनातून इशारा
The गडविश्व
अहेरी, दि. ०२ : सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत सुरू असलेल्या आलापल्ली रोड वरील प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्त्याला सुरुवात होऊन भरपुर कालावधी झालेला आहे. मात्र सदर काम कासवगतीने सुरू असून सदर रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली यांना निवेदनातून दिला आहे.
आलापल्ली मार्गावरील प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्त्याला सुरुवात होऊन भरपुर लोटला मात्र सदर काम कासव गतिने सुरू आहे. या रस्त्याने शाळेत जाणारे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात असलेले अधिकारी/कर्मचारी व नागरिक दररोज दुचाकी व चारचाकी तसेच बसणे ये-जा करीत असतात. त्यामुळे सदर वाहनधारकांना अपूर्ण व कासव गतिने सुरू असलेल्या कामामुळे नाहक त्रास सहन करावे लागत आहे तसेच रस्त्याच्या कडेला गिट्टी टाकुन असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे सदर रस्ता बांधकामाची चौकशी करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. नियमानुसार सदर रस्त्याचे काम ७-८ दिवसात पूर्ण करण्यात यावे. अन्यथा ९ जुलै ला आदोलन उभारण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी निवेदनातून दिला आहे.
सदर निवेदन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, कार्यकारी अभियंता, अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव पाठविण्यात आले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #ajaykankadalwar #alapalli #aheri)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here