कुरखेडा ते कोरची मार्गावरील वाहतूकीत बदल : ‘या’ मार्गाचा करा पर्यायी वापर

2834

– पुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीत बदल
The गडविश्व
गडचिरोली दि.२२ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ वरील कुरखेडा ते कोरची दरम्यान सती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम प्रगतीत आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य नसून सदर पुलाची वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या वळण मार्गावरुन वळती करण्यात आले आहे. परंतु हा वळणमार्ग पावसामुळे क्षतीग्रस्त होवू शकतो किंवा पूराच्या पाण्याखाली येऊन वाहतूक बंद होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक २९ जून पासून ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.

‘या’ मार्गाचा पर्यायी वापर

पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी हलक्या स्वरुपाची वाहनांकरिता कुरखेडा- चिचटोला फाटा- आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या रस्त्याचा
तसेच जड वाहतुकीकरिता कुरखेडा-वडसा-आरमोरी-वैरागड मार्ग (रा.म. क्र. ३६३)- गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

अंमलबजावणी न करणाऱ्‍या वाहतुकदार किंवा व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना असेल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

https://x.com/gadvishva/status/1804470670350536711?t=pPnxqAKeRUgZC5yap0D8aQ&s=19

(#thegdv #gadchirolipolice #gadchirolipolice #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here