– आजपासून नवे दर लागू
The गडविश्व
नवी दिल्ली, १ जून : महिन्याच्या सुरुवातीस गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होत मोठा दिलासा देण्यात आला असून हा दिलासा सर्वसामान्यांना नसून छोटे दुकानदार आणि हॉटेलमालकांना देण्यात आला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८३.५० रुपयांची कपात केली आहे. ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली असून आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर लागू झाले आहे.
दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर ८३.५ रुपयांनी स्वस्त झाला असून तो १७७३ रुपयांवर आला आहे तर १ मे २०२३ रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये होती आणि आजही ती तशीचा आहे.
( the gdv, the gadvishva, Commercial LPG Cylinder Price Today, )