वैद्यकीय रजा मंजूर करण्याकरीता मागितली लाच ; गटशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

132

– ८ हजारांची लाच रक्कम स्विकारतांना अटक
The गडविश्व
ता.प्र / सावली, २७ सप्टेंबर : वैद्यकीय रजा मंजुर कारण्याकरिता १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रुपयांची लाच रक्कम शिक्षकाकडून स्विकारतांना सावली पंचायत समितीमधील गट शिक्षणाधिकारी लोकनाथ खंडारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई २७ सप्टेबर रोजी करण्यात आली. सदर कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रादर हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. सध्या ते ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शाळेत कार्यरत आहेत तर यापूर्वी ते सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शाळेत कार्यरत होते. या दरम्यान ते वैदयकीय रजेवर होते त्यामुळे या काळातील वैद्यकीय रजा मंजूर करण्याकरिता सावली पंचायत समितीचे गट शिक्षाणाधिकारी लोकनाथ खंडारे यांच्याकडे गेले असता खंडारे यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रादार यांची लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली असता तक्रारीच्या आधारे सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले. या कारवाईत गट शिक्षणाधिकारी खंडारे यांना १० हजार रूपयांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी लाप्रवि पथकाने खंडारे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईने सावली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली असुन पुढील कारवाई सुरू आहे.
(the gdv, the gadvishva, chandrapur, saoli, acb trap, panchayat samiti saoli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here