फेरफार करण्याकरिता लाचेची मागणी : मंडळ अधिकाऱ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

904

– ७ हजार रुपयांच्या लाचेची केली होती मागणी
The गडविश्व
चंद्रपूर, २३ फेब्रुवारी : शेतजमीनीचे फेरफार आजोबाचे मृत्युपत्रानुसार तक्रारदार यांचे नावावर करून देण्याच्या कामाकरीता शंकरपूर येथील मंडळ अधिकारी धनंजय लुमदेव बुराडे यांनी ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असता किटाळी येथील कोतवाल राहूल सिध्दार्थ सोनटक्के यांनी मंडळ अधिकारी धनंजय लुमदेव बुराडे यांना लाच देण्यास अपप्रेरणा देवून तडजोडीअंती ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने पो.स्टे. भिसी, ता. चिमुर, जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे डोंगरगाव, ता. चिमुर येथील रहीवासी असून तक्रारदार यांच्या आजोबाचे नावे डोंगरगाव येथे असलेल्या गट क्रमांक १५१/१ मध्ये ०.९० हे. आर. शेतजमीनीचे फेरफार आजोबाचे मृत्युपत्रानुसार तक्रारदार यांचे नावावर करून देण्याचा कामाकरीता मंडळ अधिकारी बुराडे तक्रारदाराकडे ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने मंडळ अधिकारी विरोधात लाप्रवि कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १७ जानेवारी २०२३ व १८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान मंडळ अधिकारी धनंजय लुमदेव बुराडे यांनी लाचेची मागणी केली व कोतवाल राहूल सिध्दार्थ सोनटक्के यांनी मंडळ अधिकारी यांना लाच देण्यास अपप्रेरणा देवून तडजोडीअंती ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने गुरुवार २३ फेब्रुवारी २०२३ रोजी पो.स्टे. भिसी, ता. चिमर, जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदरची कार्यवाही लाप्रवि नागपूरचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते तसेच लाप्रवि चंद्रपूर पोलीस उप अधीक्षक अविनाश भामरे, पो.नि. जितेंद्र गुरनुले तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकों, रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, पोकॉ. राकेश जांभुळकर, अमोल सिडाम व चापोकॉ सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे. सदर कारवाई ने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

(The Gadvishva) (The Gdv) (Gadchiroli News Updates) (Chandrapur News Updates) (Acb Chandrapur)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here