नक्षल्यांनी लावलेले बॅनर काढताना स्फोट : दोन जवान जखमी

6480

– पीएलजीए सप्ताहाच्या सुरुवातीलाच नक्षल्यांचे घातपात सुरू
The गडविश्व
दंतेवाडा, दि.०२ : जिल्ह्यात नक्षल्यांनी पीएलजीए सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच धुमाकुळ माजवला असून आयईडी स्फोट घडवून आणला आहे. यात सीआरपीएफ १९५ बटालियनचे दोन जवान जखमी झाले आहेत.
नक्षल्यांचा आज शनिवार पासून पीएलजीए सप्ताह सुरू झाला आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफच्या १९५ बटालियनचे जवान जिल्ह्यातील बारसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षेत्रीय वर्चस्वासाठी बाहेर पडले होते. दरम्यान, बरसूर-पल्ली रस्त्यावरील पुलाजवळ नक्षल्यांनी लावलेले बॅनर आणि पोस्टर्स जवानांच्या लक्षात आले असता जवानांनी बॅनर आणि पोस्टर्स काढण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा स्फोट झाला. यात दोन जवान जखमी झाले असून सहकाऱ्यांनी घटनस्थळवरून लागलीच रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. अद्याप जखमी जवानांची नावे कळू शकली नाही मात्र नक्षल्यांनी पीएलजीए सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच धुमाकुळ माजवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here