–विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मौलिक असे योगदान भारतीय समाजाला दिले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला, विशेषतः शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व त्यांच्या कार्याशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठात करण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. सदर स्पर्धा ही निशुल्क असून निबंध व चित्र १२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ०२:०० वाजेपर्यंत विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे सादर करावेत.
निबंध स्पर्धेचे विषय व नियमावली
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारीता
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर: अर्थतज्ञ
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषी धोरण
४) भारतीय लोकशाहीमध्ये संविधानाचे योगदान या चार विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
निबधांची शब्द मर्यादा २ हजार ते ३ हजार शब्द असावेत. निबधांचे माध्यम मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत असावे. लिखीत निबंध ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरुपात सादर करावेत. ऑफलाईन निबंध लिफाफ्यामध्ये सादर करावेत. लिफाफ्यावर संपुर्ण नाव, संपर्क क्रमांक आणि विभाग नमुद करावा. निबंध ऑनलाईन पदधतीने सादर करतांना स्पर्धकाने स्वत:चे संपुर्ण नाव, संपर्क क्रमांक आणि विभाग स्वतंत्र पानावर नमुद करावा. तसेच सदर निबंध essay.gug@gmail.com या ई-मेलवर सादर करावेत. निबंध सुवाच्च, सुस्पष्ट असावे किंवा टंकलिखीत असावे. निबंध स्पर्धेकरीता नि युक्त केलेल्या परीक्षक समितीने दिलेला निर्णय स्पर्धकांना बंधनकारक राहील.
चित्रकला स्पर्धेचे विषय व नियमावली
१) चवदार तळे सत्याग्रह
२) काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह
३) दीक्षाभूमी नागपूर
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सर्व महाविद्यालयातील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रत्येक स्पर्धकाला चार पैकी एका विषयावर चित्र काढावे लागेल. आवश्यक असल्यास स्पर्धकाला २२ इंच व १५ इंच इतक्या आकाराच्या रेखाचित्र कागदावर चित्र काढावे लागेल. स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी सदर कागद विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठाकडून पुरविण्यात येईल. काढण्यात येणारे चित्र तैल, पाणी, पोस्टर किंवा पेस्ट रंगांमध्ये काढता येईल. रंगकामाकरीता आवश्यक असलेले साहित्य जसे, कुंचले, रंग, पेन्सिल स्पर्धकास स्वतः आणावे लागेल. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक व विभाग चित्राच्या मागे नमूद करावे.
पारितोषिकेचे स्वरुप
निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकास रुपये २ हजार व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक प्राप्त स्पर्धकास रुपये १ हजार व प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकास रुपये ५०० व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप राहील.
स्पर्धेच्या अधिक माहितीकरीता विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम 9049474119 तसेच पी.जी.टी.डी., संगणक विभागाचे सहा. प्रा. डॉ. कृष्णा कारू 9423403193 यांच्याशी संपर्क साधावा.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gondwanauniversity )