गॅरापत्ती जंगल परिसरात पोलीस जवान जाताच नक्षल्यांनी काढला पळ

1821

– मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : छत्तीसगड सीमेलगत असलेल्या जंगल परिसरात पोलीस जवान जाताच नक्षल्यांनी ठिकाणावरून पळ काढला. दरम्यान त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई ६ जून रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
कसनसूर – चातगाव, टिपागड, दलम, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर दलम आणि औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे पोस्टे गॅरापत्ती पासून ०४ किमी उत्तरेला भिमनखोजी, नारकसा जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्रित जमुन तळ ठोकून आहेत अशा गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशाने माओवादविरोधी अभियानाची योजना आखण्यात आली. असता अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक, गडचिरोली व पोस्टे गॅरापत्ती तसेच सीआरपीएफ 113 बटा. अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. भिमनखोजी जंगल परिसरात शोध मोहिम राबवित़ पुढे जात असतांना, दुपारी ३ वाजताच्या सुमारास माओवाद विरोधी अभियान पथकातील पहिल्या ग्रुपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसून आल्याने सदर कॅम्पच्या दिशेने सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असतांना पोलीस पार्टी आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडुन पहाडी व घनदाट जंगलाचा फायदा घेत अगोदरच पळ काढला.
यावेळी माओवाद्यांच्या कॅम्पच्या ठिकाणी जाऊन शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरुन सोलार प्लेट 01 नग, माओवादी डांगरी (पँट) 02 नग, माओवादी पिट्टु 06 नग, चप्पल जोड 03 नग, ताडपत्री 03 नग, प्लॅस्टीक टेंट 02 नग, बेल्ट 07 नग, टेस्टर 02 नग, लाकडी मुठ असलेला पेचकस 01 नग, शॉल 02 नग, लुंगी 01 नग, शर्ट (फुल) 04 नग, टी शर्ट 06 नग, लोअर पँट 02 नग, जॅकेट (हिरवा) 01 नग, दुपट्टे (हिरवे व लाल) प्रत्येकी 01 नग, कॅप 02 नग, बेडशिट 01 नग, मग (स्टिल) 04 नग, प्लेट (स्टिल) 06 नग, लायटर 02 नग, गंज (जर्मन) 02 नग, कैची 01 नग, मेडीकल किट, पाणी कॅन 05 नग इत्यादी दैनंदिन वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxal #gyarapatti)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here