आणखी उडाली पोलीस – नक्षल चकमक ; ७ नक्षल्यांना कंठस्नान

2346

– मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता, तीन जवान जखमी
The गडविश्व
नारायणपूर, ०८ : छत्तीसगडच्या दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस नक्षल चकमक उडाल्याची माहिती आहे. या चकमकीत ७ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले असून तीन जवानही जखमी झाल्याचे कळते. तर मृतक नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. ठार झालेल्या नक्षल्यांमधे एक
डीव्हीसीएम कॅडरचा कंपनी कमांडर असल्याचे कळते त्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पूर्व बस्तर विभाग परिसरातील मुंगेरी, गोबेल गावाच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षली उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता दंतेवाडा, नारायणपूर, जगदलपूर आणि कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजी आणि आयटीबीपीच्या पथकांक्या वतीने ६ जून रोजी अभियान राबविण्यात आले. दरम्यान ७ जून ला सकाळपासून जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. सकाळपासूनच पोलीस आणि नक्षाल्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू होता. दरम्यान चकमकीनंतर घटनास्थळाची झडती घेतली असता ७ नक्षल्यांचे मृतदेह व शस्त्रे मिळून आली. तर जवानांकडून परिसरात पुन्हा शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून मृतक नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(#thegdv #thegdv #thegadvishva #cgnews #cgpolice #naxal #encounter #policenaxalfiring )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here