गडचिरोलीत यंदाही दिवाळीत रंगणार सुरांची सांज अन् भक्तिमय पहाट
– अजब-गजब विचार मंचातर्फे ५ व ६ नोव्हेंबरला संगीत महोत्सवाचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : दिवाळीनिमित्त अजब-गजब विचार मंचाच्या वतीने यंदाही ‘संगीत महोत्सव २०२६ (पर्व-१३)’ आयोजित करण्यात आला आहे. ५ व ६ नोव्हेंबर रोजी विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात या महोत्सवातील दोन सांगीतिक कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता ‘दीपावली सांध्य मैफिल’ होणार असून, यात हर्षद गोलेसर, दुहिता गोलेसर आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ची विजेती गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांचे गायन होईल. हर्षद गोलेसर आणि दुहिता गोलेसर हे ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मुळे परिचित आहेत.
शुक्रवारी (६ नोव्हेंबर) पहाटे ५.३० वाजता ‘पहाट स्वरांच्या दिव्यांची’ हा कार्यक्रम होईल. यात गायक राजयोग धुरी आणि सन्मिता धापटे-शिंदे भक्तिसंगीत, अभंग व नाट्यगीतांचे सादरीकरण करतील. किशोर गलांडे आणि आसावरी गलांडे-देशपांडे सूत्रसंचालन करणार आहेत.
दोन्ही कार्यक्रमांना गडचिरोलीतील रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #DiwaliFestival #SangeetMahotsav2026 #MusicFestival #LiveMusic #MusicalEvening #MorningMelody #IndianClassicalMusic #DevotionalMusic #Abhang #NatyaSangeet #CulturalEvent #GadchiroliNews #TheGadvishva













