गडचिरोलीत तपासणी पथकाकडून तब्बल ११ लाखांची रोकड जप्त

1349

ती रक्कम कोणाची ? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई
The गडविश्व
गडचिरोली दि.१५ : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या तपासणी पथकाद्वारे काल १४ एप्रिल रोजी रात्रोच्या सुमारास दोन प्रकरणात एकुण ११ लाख १०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सदर रक्कम कोणाची ? असा प्रश्न उपस्थित होत असून लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात १६ मार्च पासून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पुर्ण होण्याच्या तारखेपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असून व्हिडिओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
भरारी पथक क्रमांक 126801 यांना १४ एप्रिल रोजी रात्रो ९.३० वाजता चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली जवळील, महादेव मंदीराच्या समोर नाकाबंदी दरम्यान एक पांढऱ्या रंगाच्या व्हेन्यु हुडाई कंपनीच्या चारचाकी वाहनात रोख रक्कम असलेली बॅग आढळून आली. याबाबत वाहनचालकाला समाधानकारक उत्तरे देता न आल्याने पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या निर्देशानुसार भरारी पथक प्रमुख खेमराज लेगनुरे यांनी सदर रकम जप्त केली. पंचासमक्ष वाहनाच्या मागील सीटवर असणाऱ्या काळया बॅग उघडून पाहणी केली असता सदर बॅगमध्ये एकूण १० लाख १०० रुपये आढळले. सदर रकम जप्त करुन वाहनचालकास जप्ती पावती देण्यात आली. व सदर रक्कमेबाबत असणाऱ्या आर्थिक उलाढालीचे कागदपत्रे समक्ष प्राधिकाऱ्यांकडे हजर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
यानंतर लगेचच याच ठिकाणी रात्रो ९.५० वाजताच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची फोर्ड कंपनीच्या चारचाकी वाहनाच्या समोरील डिक्कीत एक लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. सदर रकम घराच्या बांधकामाकरिता भाऊकडून आणली असल्याचे सांगण्यात आले. परंतु सदर रोख रक्कम बाबत खात्री करणे गरजेचे असल्याने भरारी पथकाद्वारे सदर रकम जप्त करून आर्थिक उलाढालीचे कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वरील दोन्ही प्रकरणात तपास सुरु असल्याची माहिती आदर्श आचारसंहिता समितीचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection2024 #election2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here