The गडविश्व
गडचिरोली, दि.१५ : लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षातर्फे प्रचार सुरू आहे. ही निवडणूक पारदर्शक व दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तीपथ तर्फे विविध उपक्रमाच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. जिल्ह्यातील गावागावात जाऊन व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून लघु चित्रपट दाखवून दारूमुक्त निवडणूक का गरजेची आहे, हे पटवून दिले जात आहे.